"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

गावाविषयी माहिती

वावर-वांगणी हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हातील जव्हार तालुक्यातील मोठ्या डोंगर,दऱ्या,नदया, जंगलाने बहरलेले आहे. आणि गावाला लागून वाग नदि व लेंडी नदी या  मोठ्या २ नद्यांचा संगम एका ठिकाणी होऊन. पुढे दादरा नगर हवेली धारणा कडे वाहत जात आहे, सन २०११ च्या जणगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ५५५१ आहे.

गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १०, अंगणवाडी केंद्र १३, सभामंडप-२  तसेच पिण्याच्या पाण्या साठी विहरी व बोर व्हेल शेततळे उपलब्ध आहेत अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत. तसेच उंबरा देवीचे मोठे मंदिर आहे.

गावातील बहुतांश लोकांची मुख्य व्यवसाय हंगामी भात, नाचणी, वरी, तूर, उडीद शेती आहे. वावर-वांगणी ग्रामपंचायती मध्ये विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना बरा पैकी लाभ मिळाला आहे.

सन २०२५ आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेले आहे. ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व १४ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे सर्व निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.  वावर-वांगणी हि ग्रामपंचायत डोंगर दऱ्या मध्ये असल्या कारणाने मोबाईल नेटवर्क नसून सुधा विकासाकडे वाटचाल करत आहे.  ग्रामपंचायत वावर- वांगणी ची सरपंच,उपसरपंचा,सदस्य यांची कमेटी ग्रा.प. स्थापण झाल्यापासून आज तगायत बिन विरोध होत आहे. (निवडणूक होत नाही )

भौगोलिक स्थान

वावर-वांगणी हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ३५कि.मी.अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ६७२.६२ हे आर असून  ग्रामपंचायती मध्ये महसूल गाव ३, ५ वार्ड आहेत त्या मध्ये १३ पाडे समाविष्ट आहेत.एकूण १६५३ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ५५५१ आहे.त्यामध्ये २७५४ पुरुष  व २७९७ महिला यांचा समावेश आहे. गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे.तसेच वावर व वांगणी  गावालगत अवघ्या १ किमी अंतरावर  वावर गावाला  पाणीपुरवठा करणारा वाघ नदी आहे. ढाढरी ,घोडीपाडा, लेंडी नदी जाऊन वांगणी पुलावरून वाहत जात असून पुढे मोठ्या वाघ नदीला जाऊन मिळतात तसेच  गावालगत वाघ नदी वाहत असते त्या नदीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो व  हे गाव मिरची,केळी,अंबा  उत्पादनात प्रसिद्ध आहे . येथे हवामान दमट उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३७°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १७°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ५९ ते ६८ से.मी. पर्जन्यवृष्टी होते.वावर  क्षेत्रातील मिरची,काजू,आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

 लोकजीवन

वावर व वांगणी  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून केळी, काजू,आंबा, व हंगामी भात,नागली,वरई,उडीद,तूर  पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. गावात आदिवासी समाजाची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

वावर  च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

संस्कृती परंपरा

वावर  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच वावर व बेहेडगाव गावात कवळी भाजी व गाव उंबरा देवी चा साथी चा कार्यक्रम वर्षातून एकदा जोरदार केला जातो त्यामध्ये तारपा नाच,तूर नाच,डोल नाच असल्या मुळे गावाचे आकर्षण बिंदू आहेत आणि गावाचा एकोपा दिसून येतो . तसेच  गावातील प्रमुख जागृत बरकती देव गावच्या पूर्वी कडे चिंचेजवळ , देवीचा माळ, माऊली कडा,सीतराय देवी, वाघ्या देव,गावदेवी ,धूळखाय कांकडखोपी,गोपीकडा, वाघ देव गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी  गावदेवी मंदिर,उबराय देवी धार्मिक  गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

प्रेक्षणीय स्थळे

गावदेवी  मंदिर :- बरकती देव गावच्या पूर्वी कडे चिंचेजवळ , देवीचा माळ, माऊली कडा,सीतराय देवी, वाघ्या देव,गावदेवी ,धूळखाय कांकडखोपी,गोपीकडा, वाघ देव मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी साथीचा धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते.व यात्रा भरवली जाते.

उबरां देवी मंदिरगावाच्या पूर्व च्या भागात असलेले हे पुरातन काळातील ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.

जवळची गावे

वावर  गाव जव्हार तालुक्यातील पासून खूप लांब अंतरावरती असून ते महारा महाराष्ट्रा चे सेवतचे टोक असून हे गाव गुजरात आणि नाशिकच्या बोंड्री वरती नदी आणि डोंगराच्या खुशीत वसलेले गाव आहे.

ओझरखेड (नाशिक) सावरपाडा (नाशिक)  दापटी, ढाढरी, जाभला, बोपदरी दाभेरी, कायरी

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


1653
5551
2754
2797

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo