आमची यशोगाथा
गावाविषयी माहिती
वावर-वांगणी हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हातील जव्हार तालुक्यातील मोठ्या डोंगर,दऱ्या,नदया, जंगलाने बहरलेले आहे. आणि गावाला लागून वाग नदि व लेंडी नदी या मोठ्या २ नद्यांचा संगम एका ठिकाणी होऊन. पुढे दादरा नगर हवेली धारणा कडे वाहत जात आहे, सन २०११ च्या जणगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ५५५१ आहे.
गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १०, अंगणवाडी केंद्र १३, सभामंडप-२ तसेच पिण्याच्या पाण्या साठी विहरी व बोर व्हेल शेततळे उपलब्ध आहेत अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत. तसेच उंबरा देवीचे मोठे मंदिर आहे.
गावातील बहुतांश लोकांची मुख्य व्यवसाय हंगामी भात, नाचणी, वरी, तूर, उडीद शेती आहे. वावर-वांगणी ग्रामपंचायती मध्ये विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना बरा पैकी लाभ मिळाला आहे.
सन २०२५ आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेले आहे. ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व १४ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे सर्व निर्णय लोकसहभागातून घेतले जातात. वावर-वांगणी हि ग्रामपंचायत डोंगर दऱ्या मध्ये असल्या कारणाने मोबाईल नेटवर्क नसून सुधा विकासाकडे वाटचाल करत आहे. ग्रामपंचायत वावर- वांगणी ची सरपंच,उपसरपंचा,सदस्य यांची कमेटी ग्रा.प. स्थापण झाल्यापासून आज तगायत बिन विरोध होत आहे. (निवडणूक होत नाही )
भौगोलिक स्थान
वावर-वांगणी हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ३५कि.मी.अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ ६७२.६२ हे आर असून ग्रामपंचायती मध्ये महसूल गाव ३, ५ वार्ड आहेत त्या मध्ये १३ पाडे समाविष्ट आहेत.एकूण १६५३ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ५५५१ आहे.त्यामध्ये २७५४ पुरुष व २७९७ महिला यांचा समावेश आहे. गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे.तसेच वावर व वांगणी गावालगत अवघ्या १ किमी अंतरावर वावर गावाला पाणीपुरवठा करणारा वाघ नदी आहे. ढाढरी ,घोडीपाडा, लेंडी नदी जाऊन वांगणी पुलावरून वाहत जात असून पुढे मोठ्या वाघ नदीला जाऊन मिळतात तसेच गावालगत वाघ नदी वाहत असते त्या नदीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो व हे गाव मिरची,केळी,अंबा उत्पादनात प्रसिद्ध आहे . येथे हवामान दमट उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३७°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १७°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ५९ ते ६८ से.मी. पर्जन्यवृष्टी होते.वावर क्षेत्रातील मिरची,काजू,आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.